मध्य रेल्वेकडून कल्याण- बदलापूरदरम्यान प्रस्तावित मार्गिका उभारणीच्या कामासाठी शनिवारी मध्यरात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे शनिवारी रात्री 1.20 ते रात्री 3.50 वाजेपर्यंत कल्याण ते कर्जतदरम्यान लोकल सेवा उपलब्ध राहणार नाहीत. त्यात शनिवारी रात्री 11.51 वाजताची सीएसएमटी ते बदलापूर, रात्री 12.2 वाजताची सीएसएमटी ते अंबरनाथ या गाड्यांसह बदलापूर -ठाणे आणि अंबरनाथ – सीएसएमटी या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
या कालावधीत काही उपनगरीय सेवा रद्द, शॉर्ट टर्मिनेट/ओरिजिनेट तसेच काही मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांनी बदललेले वेळापत्रक तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे. तर दुसरीकडे मध्य रेल्वेवरील वाढती प्रवासी गर्दी कमी करण्यासाठी कल्याण-बदलापूर आणि कल्याण-आसनगाव चौथ्या मार्गिकेचे काम सुरू असून हि मार्गिका तातडीने पूर्ण करण्याबाबत खासदारांच्या विभागीय बैठकीत गुरूवारी चर्चा झाली. यामुळे कामाला गती येऊन या मार्गिकेचा काम लवकरच पुर्ण होण्याची चिन्हे आहेत. ही मार्गिका कार्यान्वित झाल्यास अधिक लोकल फेऱ्या सुरू करणे शक्य होणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
रविवारी मेगा ब्लॉक
मध्य रेल्वेच्या मुख्य आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर रविवारी ब्लॉक घेण्यात येईल.
कुठे : माटुंगा ते मुलुंड धिम्या मार्गावर
कधी : सकाळी 11.05 ते दुपारी 3.55
परिणाम : सीएसएमटी येथून
सकाळी 10.14 ते दुपारी 3.32 या वेळेत लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील.
हार्बर मार्ग
कुठे : ठाणे ते वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान
कधी : सकाळी 11.10 ते दुपारी 4.10
परिणाम : 10.35 ते दुपारी 4.07 वाजेपर्यंत सेवा रद्द राहतील.
खालील उपनगरीय रेल्वे रद्द राहतील
BL. 61 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बदलापूर लोकल: दिनांक 27.06.2026 रोजी 23.51 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी.
AI छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अंबरनाथ लोकल: दिनांक 28.06.2026 रोजी 00.02 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल सुटणारी.
TBL4 बदलापूर – ठाणे लोकल:
दिनांक 27.06.2026 टोजी 23.04 वाजता बदलापूर येथून सुटणारी.
A2 अंबरनाथ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल:
दिनांक 28.06.2026 टोजी 03.43 वाजता अंबरनाथ येवून सुटणाटी.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.