Diva Railway Crossing : तब्बल 26 मिनिटे उघडे राहिले दिवा रेल्वे फाटक; 11 उपनगरीय लोकल आणि 6 मेल-एक्स्प्रेस गाड्या खोळंबल्या

Diva Railway Crossing : तब्बल 26 मिनिटे उघडे राहिले दिवा रेल्वे फाटक; 11 उपनगरीय लोकल आणि 6 मेल-एक्स्प्रेस गाड्या खोळंबल्या

दिवा : दिवा स्थानकाजवळील रेल्वे लेव्हल क्रॉसिंग फाटक 26 मिनिटे उघडे राहिल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळित झाल्याची घटना बुधवार, 5 ऑगस्ट रोजी सकाळी 11.49 ते 12.15 दरम्यान घडली. फाटक बंद न झाल्याने अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. 11 उपनगरीय लोकल आणि 6 मेल-एक्स्प्रेस गाड्या खोळंबल्या. गर्दीच्या वेळेत हजारो प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. दिवा, डोंबिवली, ठाणे, कल्याण, मुलुंड, भांडुप, घाटकोपरसह अनेक स्थानकांवर लोकल उशिराने धावल्या. अनेक प्रवाशांना भरगच्च लोकलमधून प्रवास करावा लागला. काहींना दोन-तीन गाड्या सोडाव्या लागल्या.

हेही वाचा : Delhi CJP Protest : 'पुरुष अधिकाऱ्याने माझ्या गुप्तांगावर…'; जंतर-मंतरवरील आंदोलक तरुणीच्या दाव्याने खळबळ

कार्यालयीन वेळ असल्याने कर्मचारी, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना फटका बसला. दिवा हे मध्य रेल्वेवरील सर्वाधिक वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून सुमारे 70 ते 75 टक्के लोकल येथे थांबतात. हे रेल्वे फाटक दिवसातून सुमारे 39 वेळा उघडले जाते. त्यामुळे वाहतुकीवर वारंवार परिणाम होतो. रखडलेल्या उड्डाणपुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याची प्रवासी संघटना व स्थानिक नागरिकांची यापूर्वी अनेकदा मागणी केली आहे. तसेच फाटक 26 मिनिटे उघडे राहण्यामागील कारण स्पष्ट करण्याची मागणीदेखील प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version