भाजप नेते आशिष शेलार यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कोकणात गणेशोत्सावासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी अधिकच्या विशेष गाड्या सोडाव्यात, अशी मागणीकेली आहे. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना सोडण्यात आलेल्या ७२ विशेष रेल्वे गाड्या फुल झाल्या असून रेल्वेने अजून अधिकच्या गाड्या सोडाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वेने सोडलेल्या उत्सव विशेष गाड्या फुल झाल्याने अजून अधिकच्या गाड्या सोडण्यात याव्यात, अशी विनंती रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांची पुणे दौऱ्यात भेट घेऊन केली. यावेळी भाजपा शहर अध्यक्ष मुळीक, योगेश टिळेकर सोबत होते. pic.twitter.com/A30RozrwUo — Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 11, 2021
गणेशोत्सवाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार येथून चाकरमानी आपल्या गावी जातात. यावर्षी कोकण रेल्वे प्रशासनाने ७२ अतिरिक्त गाड्या सोडण्याची घोषणा केली. तसेच बुकिंग सुरू होताच त्यांचे बुकिंग पुर्ण क्षमतेने होऊन बरेचजण अद्याप प्रतिक्षा यादीतच आहेत, याकडे शेलार यांनी नव्या रेल्वे राज्य मंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.
अधिकच्या बुकिंग सुविधा आणि अजूनच्या काही गाड्या कोकणातील चाकरमान्यांना उपलब्ध करुन देण्याबाबत कोकण रेल्वेला निर्देश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी भाजपा शहर अध्यक्ष जगदीश मुळीक आणि योगेश टिळेकरसुद्धा उपस्थित होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.