ऑनलाईन गेमची जाहिरात करणं सचिनला भोवणार ?

ऑनलाईन गेमची जाहिरात करणं सचिनला भोवणार ?

मुंबई, २८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : भारतरत्न सचिन तेंडुलकर याने एका ऑनलाईन गेमची जाहिरात केली. ही जाहिरातबाजी सचिनला भोवण्याची शक्यता आहे.

सचिन तेंडुलकर भारतरत्न आहे. एवढ्या मोठ्या व्यक्तीने कोणत्या जाहिराती कराव्या आणि कोणत्या करू नये याचे भान राखणे आवश्यक आहे. पण सचिनने ही काळजी घेतली नाही. ऑनलाईन गेमची जाहिरात केली. यामुळे संतापलेल्या आमदार बच्चू कडू यांनी कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सचिन तेंडुलकरला लवकरच वकिलामार्फत नोटीस बजावणार असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी जाहीर केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version