‘आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खुश करणारे कंत्राटी कामगार’ – गोपीचंद पडळकर

‘आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खुश करणारे कंत्राटी कामगार’ – गोपीचंद पडळकर

ओबीसींवर माझा विश्वास नाही असे विधान मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. मात्र आव्हाडांच्या या विधानामुळे राजकीय उधाण आले असून विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला आहे. आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खुश करणारे कंत्राटी कामगार, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले, ‘जितेंद्र आव्हाड म्हणतात माझा ओबीसींवर विश्वास नाही. आव्हाड कोणता इतिहास वाचतात हे नेमकं माहित नाही, परंतु मंडल आयोगाला प्रस्थापितांनी विरोध केला. शेकडो ओबीसींनी स्वत:ला पेटवून घेतले. हा इतिहास माहित नाही का तुम्हाला? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे, तर आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खुश करण्यासाठीचे कंत्राट कामागार आहेत,’ अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

गोपीचंद पडळकर यांनी ट्विट केले की, ‘ओबीसींना आपले फुटसोल्जर म्हणून वापरणाऱ्या प्रस्थापितांच्या सरकारचे ओबीसी प्रेम फसवे आहे. ओबीसीवर तुम्हाला प्रेम असेल तर सर्वच जागेवर ओबीसी उमेदवार देणार आहे, त्यांना निवडून द्या. अन्यथा तुम्हीही फक्त ओबीसी उमेदवार देणार, असे तरी जाहीर करा’.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version