जय महाराष्ट्र न्युज, औरंगाबाद
औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याची घटना घडलीय. रात्री उशिरा डॉ. हर्षल चव्हाण यांना रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केली. मारहाण होत असताना वरिष्ठ डॉक्टरांनी हस्तक्षेप केल्यानंतरही त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप निवासी डॉक्टरांनी केलाय. या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी सामूहिक मास बंकवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री १२च्या सुमारास जिभेचा कॅन्सर झालेला एक रुग्ण ज्याच्या गळ्यात सुई टोचलेली होती तो उपचारासाठी घाटी रुग्णालयात आला होता.
त्याच्यावर उपचार करताना रुग्णाच्या नातेवाईकांनी गर्दी केली. त्यावेळी गर्दी कमी करण्यासाठी डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेर जाण्यास सांगितले. याचा राग धरून सुरुवातीला शाब्दिक चकमक आणि त्यानंतर त्याचे रूपांतर मारहाणीत झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यामुळे आम्हाला सुरक्षित वाटत नाही तोपर्यंत मास बंक करण्याचा निर्णय निवासी डॉक्टर संघटनेनं घेतला आहे. यावर घाटी प्रशासनानेही पोलिसात तक्रार करून कारवाई करण्यासंदर्भात पाऊल उचलणार असल्याचं सांगितले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.