ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांची 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
डॉ. अरुणा ढेरे यांच्या नावावर साहित्य महामंडळाच्या बैठकीत एकमत झाले.
काव्य, समीक्षण, ललित, वैचारिक अशा साहित्याच्या विविध प्रांगणात अरुणा ढेरे यांनी मुक्तसफर केली. लोकसंस्कृतीचा अभ्यास, हा त्यांच्या साहित्यप्रवासातला महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
निवडणूक न होता सन्मानानं निवड झाली याबद्दल ढेरे यांनी आनंद व्यक्त केला. दरम्यान, ‘साहित्याची परंपरा पुढे घेऊन जाणं हे माझे कर्तव्य असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. 92वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळमधील पोस्टल मैदानावर होणार आहे. 11, 12 आणि 13 जानेवारी 2019 असे तीन दिवस साहित्याचा मेळा यवतमाळमध्ये भरणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.