महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मंदिरातील 509 वर्षांपूर्वीचा ताम्रपट आणि सनद दुस-या एका पुजा-याच्या कुटुंबाकडे सापडली. त्यामुळे तत्कालीन सत्ताधा-यांनी आणखी किती जणांना सनद दिल्या यावरून नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. आई तुळजाभवानीचे मुख्य भोपे पुजारी असून पूजा करण्याचा मान देण्याची मागणी तुळजापूर येथील नागेशशास्त्री, विठ्ठल शास्त्री, नंदी बुवा अंबुलगे यांनी जिल्हा न्यायालयाकडे केलीय. अली आदिलशाह महमंद यांनी सन 1509मध्ये ताम्रपट दिला असून त्यात नित्य पूजा करण्याचा अधिकार आणि मानपान दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
या ताम्रपटामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की स्वरुपानंद गुरु नरहर नंदीबुवा ब्राम्हण यांना तुळजा भवानीची पुजा करण्यास मनाई केल्यास त्यांना कालि तुको देवी ( तुळजा भवानी ) याची आण आहे, या नंतर हैद्राबाद येथील निजाम मिन जानिब शहंशाहे वख्फ यानी रंभाजी बाजीसाहेब निंबाळकर यांना आज्ञापत्र ( सनद ) दिले होते की तुळजापुर येथील सखाराम गुरु आनंद नंदी बुवा अंबुलगे यांच्याकडून काली तुकाई देवी म्हणजे तुळजा भवानीची नित्य पुजा करुन घेणे व नरसिंह पुजा करुन घेणे या बदल्यात मंदिरात 6 खोल्या व 4 बिगा जमिन दिली होती तसेच मिर मजलीस मौलवी उस्मान अली व मोहतमीम हुसेनी श्री संस्थान तुळजापुर यांनी 1282 फसली ( 1873इ.स) रोजी राजाराम गुरु सखाराम नंदीबुवा यांना आदेश दिला होता.
तुळजा भवानीची व नरसिंहाची नित्य पुजा करणे यामध्ये इतरांनी कोणीही हस्तक्षेप करु नये तसेच निजाम राजवटीतील मिर उस्मान अली यांनी 27 रमजान 1311 हिजरी (इ.स 1891 ) रोजी विरासत दिली होती त्यामध्ये तुळजा भवानीची नित्य पुजा व नरसिंह पुजा यांची नित्य पुजा करण्याच्या अटीवर विरासत दिली होती. यावेळी तुळजापुर तिर्थ क्षेत्रातील महत्वाचे 4 मठातील मठपती यांनी साक्ष दिली होती.
नंदीबुवा अंबुलगे हेच तुळजा भवानीचे मुख्य भोपे पुजारी आहेत ताम्रपट सनद विरासद या आधारे आम्हाला तुळजा भवानीची नित्य पुजा करण्याची मागणी नागेश शास्त्री विठ्ठल, शास्त्री नंदीबुवा अंबुलगे यांनी केली आहे.
आदिलशाह महंमद बादशहा यांनी हिजरी 930 (सन 1509 इ.स ) मध्ये ताम्रपट दिले आहे, त्यामध्ये काली तुको देवी म्हणजेच तुळजा भवानी व नरसिंह याची नित्य पुजा करण्याचा अधिकार व मानपान दिला आहे.
नुकतीच पहिल्या आदिलशहाने दिलेली हिजरी 910 ची पुजाऱ्याच्या अधिकाराची सनद समोर आली असताना आता हिजरी 930 (509 वर्षा पुर्वी ) चा ताम्रपट आणि सनद दुसऱ्या एका पुजारी कुटुंबाकडे असल्याचे समोर आले आहे यामुळे तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी आणखी किती जणांना आशा सनद दिल्या आहेत कळत नसले तरी आमच्या शिवाय दुसऱ्या कोणाकडे हे दस्तऐवज नसल्याने आम्हाला शास्त्रोक्त पुजा करण्याचा हक्क असल्याचा दावा केला आहे. या सनदेचे हक्कदार नागेश शास्त्री, विठ्ठल शास्त्री, नंदी बुवा अंबुलगे यांनी केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.