जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग
प्रसिद्ध अंगनेवाडीच्या यात्रेची तारीख जाहीर झाली आहे.
लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं आंगणेवाडीची श्री भराडी देवीची यात्रा २७ जानेवारीला भरणार आहे.
काही दिवसांपूर्वी यात्रेची तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला.
यात्रोत्सवात यावर्षीही 10 लाखांहून अधिक भाविक हजेरी लावतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
भराडी देवी यात्रेच्या तारीख निश्चितीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होते. या यात्रेदरम्यान कोकणात जाणाऱ्या गाड्यांचं तिकीट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी होते.
यात्रोत्सवाला जाणासाठी मोठ्या प्रमाणात गाड्यांचं बुकिंग होतं. कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीची यात्रा शनिवार 27 जानेवारी 2018 रोजी होणार आहे.
आंगणेवाडी यात्रेच्या तारखेत कधीही बदल होत नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये असे आगणे कुटुंबिय आणि आंगणेवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने नरेश आंगणे यांनी जाहीर केले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.