देशात ओमायक्रॉनच्या रूग्णांमध्ये वाढ; जयपूरमध्ये एकाचा मृत्यू

देशात ओमायक्रॉनच्या रूग्णांमध्ये वाढ; जयपूरमध्ये एकाचा मृत्यू

भारतात कोरोनासह ओमायक्रॉन विषाणूच्या रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. देशातील २४ राज्यांमध्ये २ हजार १३५ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. ओमायक्रॉनच्या रुग्णांपैकी ८२८ रुग्ण उपचारांनंतर घरी परतले आहेत. तर सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले असून राज्यात जवळपास ७०० नागरिकांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले आहे.

देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून देशात ओमायक्रॉनमुळे पहिला मृत्यू झाला आहे. राजस्थानमधील जयपूरमध्ये ओमायक्रॉनमुळे एका ७२ वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

ओमायक्रॉन विषाणूचा अहवाल येण्याआधीच जयपूरमधील या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ओमायक्रॉनबाधित व्यक्तिला मधूमेहासह आणखी आजार होते. त्यामुळे त्या व्यक्तीवर कोरोनाच्या उपचारांसोबत त्यांच्या इतर आजारांवरही उपचार सुरू होते. दरम्यान ओमायक्रॉन विषाणूचा अहवाल येण्याआधीच या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मात्र या व्यक्तिचा मृत्यू ओमायक्रॉनमुळेच झाला असल्याचे मानले जात आहे.

महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण

महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत, तर महाराष्ट्रासोबत दिल्ली आणि केरळमध्येही ओमायक्रॉनचे रुग्ण आढळत आहेत. महाराष्ट्रात जवळपास ७०० नागरिकांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे तर दिल्लीत ४६४ नागरिक ओमायक्रॉनबाधित आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version