Mumbai KEM Hospital News : KEM रुग्णालय पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! नर्सिंग महाविद्यालयाच्या जेवणात आढळल्या अळी; अन्नसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मुंबईतील केईएम रुग्णालयाच्या नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या जेवणात अळी आढळल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
Mumbai KEM Hospital News : KEM रुग्णालय पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! नर्सिंग महाविद्यालयाच्या जेवणात आढळल्या अळी; अन्नसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मुंबईतील केईएम रुग्णालयाच्या नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या जेवणात अळी आढळल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, वसतिगृहातील भोजनाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या मेसचे सध्या नूतनीकरण सुरू असल्याने तात्पुरत्या स्वयंपाकघरातून जेवण तयार केले जात आहे. यावेळी केईएम नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या जेवणात अळी आढळली आहेत.

हेही वाचा- Mushroom: पावसाळ्यात मशरूम खाताय? आधी ही माहिती वाचा; एक चूक ठरू शकते जीवघेणी

याप्रकरणी विद्यार्थ्यांनी जेवणाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दरम्यान कोणत्याही विद्यार्थ्याला उलट्या, जुलाब किंवा इतर आरोग्यविषयक त्रास झाल्याची नोंद नाही. याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने संबंधित मेस कंत्राटदाराला ‘शो कॉज’ नोटीस बजावली असून अधिष्ठाता डॉ. रविंद्र पाठक यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत.

तसेच विद्यार्थ्यांकडून तक्रार आल्यास तत्काळ कारवाई केली जाईल असे देखील प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे. त्याचसोबत अन्नाची गुणवत्ता व स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा प्रशासनाचा दावा आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी भोजनाची गुणवत्ता, स्वच्छता आणि नियमित तपासणी याकडे अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे वैद्यकीय शिक्षण संस्थांमधील अन्नसुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version