भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे आज एकदिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत.
भाजपाच्या समर्थन वाढीसाठी सुरु करण्यात आलेल्या लोकसंपर्क अभियानांतर्गत अंतर्गत ते आज मुंबईमध्ये येणार असून प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित, ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेणार आहेत. त्यानंतर ते मोतोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार आहेत. ही भेट राजकीय क्षेत्रामध्ये महत्वाची मानली जात आहे.
Aaj BJP ki adhyaksha mananeey @AmitShah ji se meri mulaqaat honewali thi parantu mujhe food poisoning hone ki wajah se maine unse telephone pe baat karke milne mein asamarthta vyakt ki aur agli baar jab bhi wo Mumbai aayenge tab unse milne ka nivedan kiya. — Lata Mangeshkar (@mangeshkarlata) June 6, 2018
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.