फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात अजित पवारांचे फलक

फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात अजित पवारांचे फलक

राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. आधी भाजप प्रवेशावरून आणि आता त्यांच्याबद्दल भावी मुख्यमंत्री म्हणून झळकणारे बॅनर. अशातच काल नागपूर जवळील बुटीबोरी येथे नगर परिषदेचे अध्यक्ष बबलू गौतम यांनी देवेंद्र फडणवीसांचे भावी मुख्यमंत्री म्हणून नमूद असलेले बॅनर लावले होते. मात्र फडणवीसांनी खडसावताच हे बॅनर काढण्यात आले. त्यानंतर आता नागपुरातच अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकल्याने आता नव्या चर्चा रंगल्या आहे.

काही दिवसांपूर्वी अजित पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होणार अशी चर्चा रंगली होती. तर त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरही झळकले होते. आता तर नागपुरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी ‘अजित पवार भावी मुख्यमंत्री’, असे पोस्टर नागपूर शहरात लावले. याशिवाय ‘वचनाचा पक्का, हुकमाचा एक्का, मुख्यमंत्रिपदासाठी अजितदादा पक्का’, अशी या बॅनरमध्ये नमूद केले गेले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा २०२४मध्ये ‘कौन बनेगा मुख्यमंत्री’, याची स्पर्धा सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version