Uttam Jankar : ‘…तर दादांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल’; काका-पुतण्यांच्या युतीवर जानकरांचं वक्तव्य

महापालिका निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने शरद पवार गटासोबत युती करून भाजप विरोधात निवडणूक लढवली.
Uttam Jankar : ‘…तर दादांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल’; काका-पुतण्यांच्या युतीवर जानकरांचं वक्तव्य

माळशिरस : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीने घवघवीस यश मिळवले. या निवडणुकीतील धक्कादायक लढत ही पुणे, पिंपरी-चिंचवडमधील भाजप विरूद्ध राष्ट्रवादी ही होती. अजित पवार यांची राष्ट्रवादी महायुतीत भाजप आणि शिवसेनेसोबत सत्तेत आहे. मात्र, महापालिका निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने शरद पवार गटासोबत युती करून भाजप विरोधात निवडणूक लढवली. त्यामुळे काका-पुतण्या परत एकत्र येत आहेत का, या चर्चांना उधाण आले. 

यासंबंधी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, शरद पवार आणि अजितदादा पवार एकत्र येतील का, मला माहित नाही. पण जर एकत्र यायचं असेल, तर अजितदादांना सत्तेतून बाहेर पडावं लागेल, असं वक्तव्य माळशिरसचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी केले. दोघे एकत्र येतील, असे मला वाटत नाही. शरद पवार यांचा एक विचार आहे. मात्र अजित पवार आता महायुतीत असल्यामुळे शरद पवार गटात यायचे असल्यास त्यांना त्यांचा विचार बदलावा लागेल. ते काही शक्य वाटत नाही. बिर्याणीत गुळवणी मिसळली जात नाही. पक्षाने एखादं धोरण घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे. त्यामुळे अजितदादांना पवार गटासोबत यायचे असल्यास त्यांना सत्तेतून बाहेर पडावं लागेल, असे होईल असं मला वाटत नाही, असे जानकर यांनी नमूद केले.

हेही वाचा : Sanjay Raut Slams BJP: ‘पंतप्रधानांनी आत्मचिंतन करायला हवं, त्यांना राजकीय इतिहासाची…’; राऊतांची भाजपवर घणाघाती टीका

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version