जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर
भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या वडिलांच्या गाडीने शुक्रवारी पहाटे पुणे-बंगळुरु महामार्गावर एका महिलेला धडक दिलीये.
कोल्हापूरातील कागल येथे ही घटना घडली आहे. आशाताई कांबळे असे मृत महिलेचे नाव असून त्या 67 वर्षांच्या होत्या.
या अपघातात महिलेचा मृत्यू झाला असून कागल येथे रस्ता ओलांडत असताना हा अपघात घडलाय. मृत महिला या इचलकंरजीमधील शहापूर येथील सावित्रीनगर जवळ रहात होत्या.
अपघातामुळे कायदा-सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण झाला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान अजिंक्यचे वडिल मधुकर राहणे यांच्यावर कागल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.