Sambhajinagar Crime News : धक्कादायक! गॅरेजसमोर बसलेल्या तरुणांवर भरदिवसा ॲसिड हल्ला

छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गॅरेजवर बसलेल्या दोन युवकांवर अज्ञात आरोपींनी ॲसिड हल्ला केल्याची घटना घडली आहे.
Sambhajinagar Crime News : धक्कादायक! गॅरेजसमोर बसलेल्या तरुणांवर भरदिवसा ॲसिड हल्ला

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील विष्णुनगर परिसरात गॅरेजवर बसलेल्या दोन युवकांवर अज्ञात आरोपींनी ॲसिड हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दोन्ही युवक सिराज आणि वैभव हे गॅरेजसमोर बसलेले असताना अचानक काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर ॲसिड फेकून हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही युवक गंभीर जखमी झाले असून त्यांच्या अंगावर व चेहऱ्यावर जखमा झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनेनंतर जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

हेही वाचा- Income Tax Notice to E-rickshaw Driver: धक्कादायक! ई-रिक्षा चालकाला 38.5 कोटींची आयकर नोटीस; IT विभागाच्या कारवाईने गरीब कुटुंब हादरलं

या घटनेची माहिती मिळताच जवाहरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version