Akola Crime : रक्ताच्या नात्याला लागला काळिमा! शेती-संपत्तीच्या वादातून भावानेच काढला भावाचा काटा; कानाजवळ दिसलं…

अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेती आणि संपत्तीच्या वादातून एका युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
Akola Crime : रक्ताच्या नात्याला लागला काळिमा! शेती-संपत्तीच्या वादातून भावानेच काढला भावाचा काटा; कानाजवळ दिसलं…

अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेती आणि संपत्तीच्या वादातून एका युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने अकोला जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अकोला शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या निंबी मालोकार गावातील शेतशिवारात ही धक्कादायक घटना घडली.

हेही वाचा- Mumbai Crime : ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीच्या घरावर चोराचा डल्ला; 76.39 लाखांचा ऐवज लंपास; आरोपीला बिहारमधून अटक

अमोल गजानन मालोकार असं गोळीबारात मृत्यू झालेल्या युवकाचं नाव असून अमोल मालोकार याच्यावर एक-दोन नव्हे तर तब्बल तीन ते चार गोळ्या झाडण्यात आल्या. यादरम्यान अमोलच्या कानाजवळ आणि शरीराच्या इतर भागावर गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली.

विशेष म्हणजे, समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार हा गोळीबार कौटुंबिक संपत्ती आणि शेतीच्या वादातून झाल्याचं समोर येत आहे. अमोलचा दूरचा चुलत भाऊ अजय नामक व्यक्तीवर या हत्येचा संशय असून, घटनेनंतर तो फरार असल्याची माहिती आहे. दरम्यान या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version