समृद्धी महामार्गाचं लोकार्पण रखडलं

समृद्धी महामार्गाचं लोकार्पण रखडलं

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे.  लोकार्पणाच्या आधीच नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर आणखी एक दुर्घटना घडली आहे. समृद्धी महामार्गावर सलग तीन दिवसात ही दुसरी दुर्घटना घडली आहे. समृद्धी महामार्गावरील अपघातांमुळे अद्याप या महामार्गाचे रखडलं आहे.

बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या पॅकेज ०७ मधील सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा या गावाजवळ दोन डोंगराळ प्रदेशाला जोडणाऱ्या निर्माणाधीन उड्डाणपुलाचे काही गर्डर कोसळले. बुधवारी (२७ एप्रिल) सायंकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यात एक ट्रेलर ट्रक या मोठ्या गर्डर खाली येऊन त्याचे मोठं नुकसान झाले आहे. मात्र, या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही.

मुख्यमंत्री घेणार समृद्धीच्या कामाचा आढावा

समृद्धी महामार्गावर सलग तीन दिवसात दुसरी दुर्घटना घडली आहे. त्यामुळे महामार्गाचे लोकार्पण रखडंल आहे. समृद्धी महामार्गावर उद्घाटनापूर्वीच अपघात घडत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काळजी वाटली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा घेणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version