धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून टोळक्याकडून तरुणाची ह’त्या

धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून टोळक्याकडून तरुणाची ह’त्या

मानखुर्द येथे अंगाचा धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणाहून 5 ते 6 युवकांनी तरुणास बांबू आणि काठीने मा’रहा’ण केली. यात तरुणाचा मृ’त्यू झाला. मृतक तरुणाचं नाव श्रीराम सिंह असून त्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून मानखुर्द पोलिसानी 6 जणांना ताब्यात घेतलं आहे.

काय घडलं नेमकं?

रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास श्रीराम आपल्या मावशीच्या मुलाला खाली सोडण्यासाठी आला असता तेथील टोळक्यातील एकाला श्रीराम याचा धक्का लागला आणि त्यातून वाद झाला.

तेव्हा टोळक्यातील या 5 ते सहा जणांनी बांबू आणि काठ्याने श्रीराम यास बेदम मा’रहा’ण केली.

हे टोळकं रोहिंग्या मुस्लिम असून ते मुंब्रा येथून आल्याचं सांगण्यात येतंय.

या इमारतीमध्ये ते स्थानिक युवकांना घेऊन नशापाणी करत असल्याची माहिती मृतकचा काकांनी दिली आहे.

पोलीस घटनास्थळी आल्यावर श्रीराम याला उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात घेऊन गेले.

तेथे डॉक्टरांनी त्याला मृ’त घोषित केले.

श्रीराम याचे वडील शिवकुमार सिंग यांच्या तक्रारीवरून मानखुर्द पोलिसांनी गुन्हा दाखल करून 6 जणांना ताब्यात घेतलं आहे. यातील दोन आरोपींवर यापुर्वी काही गुन्हेसुद्धा दाखल असल्याची माहिती या विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त देसाई यांनी दिली. तर पोलिसांनी मात्र हे रोहिंग्या मुस्लिम असल्याचं स्पष्ट केलेलं नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version