99th Sahitya Sammelan In Satara : साताऱ्यात 99 व्या साहित्य संमेलनाचा शुभारंभ; शिवेंद्रसिंहराजे भोसले व विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत उद्घाटन

साताऱ्यातील ऐतिहासिक शाहू स्टेडियम येथे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आज दिमाखात सुरू झाले.
99th Sahitya Sammelan In Satara : साताऱ्यात 99 व्या साहित्य संमेलनाचा शुभारंभ; शिवेंद्रसिंहराजे भोसले व विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत उद्घाटन

सातारा : साताऱ्यातील ऐतिहासिक शाहू स्टेडियम येथे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आज दिमाखात सुरू झाले. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा शाहूपुरी आणि मावळा फाऊंडेशन, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या संमेलनाचे ध्वजारोहण साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.

उद्घाटन सोहळ्याला संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. यानंतर ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन 98 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते झाले. तर यावर्षीचे संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत कविकट्टा, गझलकट्टा आणि प्रकाशन कट्टा या कार्यक्रमांचा उद्घाटन झाले.

हेही वाचा : Pooja More Video : पहलगामसंबंधित ‘ते’ वक्तव्य भोवलं; पूजा मोरेंच्या अश्रूंचा बांध फुटला, ओक्साबोक्सी रडतं सांगितला घडलेला प्रकार

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 व्या जयंती वर्षानिमित्त आणि संत तुकोबारायांच्या स्मृतिवर्षानिमित्त ‘बहुरूपी भारूड’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. चार दिवस चालणाऱ्या या भव्य साहित्य संमेलनात विचारमंथन, काव्यवाचन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी साहित्यविश्व एकत्र येत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version