मुंबई, १३ जुलै २०२३, प्रतिनिधी : बालासोरमध्ये घडलेल्या अपघातामुळे संपूर्ण देश हादरला होता. या दुर्घटनेत ३ रेल्वेच्या अपघातात सुमारे ३९३ लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या अपघाताची सीबीआयकडून कसून चौकशी करण्यात आली असून या कारवाई अंतर्गत ७ कर्मचाऱ्यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे.
या ७ रेल्वे कर्मचाऱ्यांनी काम करताना निष्काळजी पणा केल्यामुळे, अनेकांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहे. सिग्नल देण्यात चूक झाल्यामुळे हा अपघात घडला असा ठपका या सातही अधिकाऱ्यांवर लावण्यात आला आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून ह्या ७ कर्मचाऱ्यांना अपघाताचे दोषी ठरवण्यात आले असून, २ जूनला बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात ३९३ लोकांनी आपला जीव गमावला होता तर, १२०० पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले होते.
याआधी, सीबीआयने सिनियर सेक्शन इंजिनियर अरुण कुमार महंत, सेक्शन इंजिनिअर मोहम्मद आमिर आणि टेक्निशिअन पप्पू कुमार यांना अटक केली होती. या तिघांसह आणखी ७ अधिकाऱ्यांना कोठडी सुनावण्यात आली होती , त्यांची ५ दिवसांची कोठडी पूर्ण होण्याआधी त्यांना सीबीआय विशेष कोर्टात हजर करण्यातआलं जिकडे त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली. आणि नियमानुसार २४ तासांपेक्षा अधिक काळ शासकीय कर्मचारी अटकेत राहिल्यास त्याला निलंबित करण्यात येते.
दरम्यान साऊथ इस्टर्न रेल्वेचे जनरल मॅनेजर अनिल कुमार मिश्रा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की जर एखादा शासकीय कर्मचारी २४ तासापेक्षा अधिक काळ अटकेत राहिला तर तो निलंबित होतो, या अपघाता प्रकरणी आतापर्यंत ७ शासकीय रेल्वे अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. जर अधिकारी जागरूक असते तर हा अपघात घडलाच नसता असंही जनरल मॅनेजर अनिल कुमार मिश्रा यांनी सांगितलं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.