राज्यात गुरुवारी कोरोनाच्या ६९४ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. गुरुवारी १८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात गुरुवारपर्यंत एकूण ७९,९२,२२९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१४ टक्के एवढे झाले आहे. गुरुवारी एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्युदर १.८२ टक्के एवढा आहे. गुरुवारपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,६६,१८,५५६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,४३,६८६ (०९.४० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात गुरुवार रोजी एकूण ३,०१६ सक्रिय रुग्ण आहेत.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचे 13,509 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत 4,41,68,321 लोकांना कोरोनावरील उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याच वेळी, आतापर्यंत 5,30,862 लोकांना कोरोना संसर्गामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.