अल्पवयीन लैंगिक अत्याचार प्रकरणी दुसऱ्या मुलाची मृत्यूशी झुंज अपयशी

अल्पवयीन लैंगिक अत्याचार प्रकरणी दुसऱ्या मुलाची मृत्यूशी झुंज अपयशी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईच्या पवई येथील फिल्टरपाडा परिसरात 2 अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. त्यातील एका मुलाने लैंगिक अत्याचाराचा धक्का सहन न झाल्यानं विष प्राशन केलं होतं तर एक मुलगा मृत्युशी झुज देत होता.

 

 

अखेर आज या मुलाची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. या मुलाने आज केईएम रुगण्यालयात आपला प्राण सोडला. लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या अवघ्या 13 वर्षीय मुलाच्या मृत्युनंतर संतापाची लाट उसळली आहे.

 

 

या प्रकरणी आरोपी अद्यापही मोकाट फिरत आहेत. एकीकडे महिलांवर होणारे अत्याचार, महिलांच्या सुरक्षिततेता प्रश्न होताच, तर आता अल्पवयीन मुलांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकारामुळे  खळबळ उडाली आहे.

 

दोन लहान मुलांना नराधमाने खोलीत डांबून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. तर घाबरुन त्या चिमुरड्यांनी विष प्राशन केले होते. दरम्यान, त्यातील एका चिमुरड्याने बाबा मेरे साथ गलत हुआ है म्हणत आपले प्राण सोडले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version