कोल्हापूर, २० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : साहित्य अकादमीकडून यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. मराठी कादंबरीसाठी कृष्णात खोत यांच्या रिंगाण या पुस्तकाला पुरस्कार जाहीर झाला आहे. गावठाण, रौंदाळा, झडझिंबड अशा अनेक कादंबरीच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृती आणि संघर्ष मांडणाऱ्या खोत यांच्या रिंगाण या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. यापूर्वी त्यांना महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कारही मिळाला होता.
पन्हाळा किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या निकमवाडी येथे जन्मलेल्या कृष्णात खोत यांनी प्राध्यापकाची नोकरी करत कादंबरी लेखन केले आहे. त्यांच्या कादंबऱ्यांतून ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडते.