अमरावती अकोला राष्ट्रीय महामार्ग बांधणीला सुरुवात

अमरावती अकोला राष्ट्रीय महामार्ग बांधणीला सुरुवात

अमरावती अकोल्यात चार दिवसात ७५ कि.मी राष्ट्रीय महामार्गची निर्मिती करण्याचे काम सुरु आहे. लोणी ते मूर्तिजापूरपर्यंत एका बाजुच्या दोन लेनमधील ७५ कि.मी.पर्यंतचे चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. हे काम चार दिवसांत करण्याचे नियोजन राज पथ इन्फ्रा या कंत्राटदार कंपनीने केले आहे.या रस्त्याच्या कामाला सकाळ पासून युद्ध स्तरावर काम सुरू झाले आहे. लोणी जवळ विधिवत पूजा करून या कामाला सुरुवात झाली आहे त्यासाठी मनुष्यबळ आणि मोठ्या मशिनरी लावण्यात आल्या असून २४ तास हे काम सुरु राहणार आहे. या कामासाठी ७२८ मनुष्यबळ कार्यरत राहणार आहेत.

या कामाला गती येण्याच्या दृष्टीने ३ जूनला सकाळी ६ वाजल्यापासून ते ७ जूनच्या दुपारपर्यंत ‘बिटुमिनस काँक्रिट’च्या सर्वात लांब अखंड रस्त्याची निर्मिती करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील ५४ कि.मी. लांबीमध्ये एका बाजूच्या दोन लेनमधील ७५ कि.मी.च्या रस्त्याचे काँक्रिटीकरण चार दिवसांत करण्याचे प्रयत्न आहेत. निसर्गाची साथ लाभून हा प्रयत्न यशस्वी झाल्यास त्याची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद होईल, असा दावा कंत्राटदार कंपनीकडून करण्यात आला.

महामार्ग विस्तारणार

अमरावती अकोला राष्ट्रीय महामार्ग बांधणीला सुरुवात
महामार्ग ७५ कि.मी. लांबीचा
अमरावती ते नवापूरपर्यंतच्या चौपदरीकरणाला २०१३ मध्ये मंजुरी
७२८ कर्मचारी आणि मजूर कार्यरत
सलग २४ तास राहणार काम सुरू राहणार
‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’ कामाची नोंद होण्याची शक्यता

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version