Moshi Building Collapse : मोशी इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 11 जणांना वाचवण्यात यश; 12 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकून, बचावकार्य सुरू

Moshi Building Collapse : मोशी इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 11 जणांना वाचवण्यात यश; 12 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकून, बचावकार्य सुरू

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी कचरा डेपो येथे बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास कचऱ्याचा डोंगर डेपोतील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या कार्यालय इमारतीवर कोसळला. हजारो टन कचरा इमारतीवर कोसळल्याने तीन मजली इमारत कोसळून त्यात काही कामगार अडकून पडले. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आतापर्यंत 11 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले आहे. तर अजूनही 12 जण ढिगाऱ्याखाली अडकून पडले असल्याची माहिती मिळत आहे. या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरच वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबविणाऱ्या अँटनी लॉरा या कंपनीने तीन मजली इमारत उभारली आहे. चार महिन्यांपूर्वीच या इमारतीचे उद्घाटन झाल्याचे येथील कामगारांनी सांगितले. गेले तीन ते चार दिवस सातत्याने पाऊस येत असल्याने या इमारतीवर कचऱ्याचा एक डोंगर कोसळला. हजारो टन कचरा इमारतीवर आल्याने इमारत क्षणात कोसळली. दरम्यान, काल उशीर मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.

हेही वाचा : Maharashtra Earthquake : महाराष्ट्र हादरलं! नांदेड, परभणीत जाणवले भूकंपाचे तीव्र धक्के; हिंगोलीत भूकंपाचे केंद्र

‘सातत्याने पाऊस सुरू असल्याने मोशीतील कचरा डेपोतील कचऱ्याचा डोंगर ढासळला. त्यामुळे एक तीन मजली इमारत कोसळली. या इमारतीत एकूण 23 कामगार होते. त्यातील पाच कामगार वरच्या मजल्यावर असल्याने उड्या घेऊन बचावले. मात्र, 11 कामगार कचरा आणि इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले. त्यातील सात कामगारांना ‘एनडीआरएफ’ आणि आर्मी जवानांनी सुखरूप बाहेर काढले. उर्वरित 12 जणांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातील तीन जणांशी संपर्क झाला आहे. मात्र, त्यांच्या पायावर वजन पडल्याने त्यांना बाहेर काढता येत नाही. त्यांना बाहेर काढण्याचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. वेळ लागला, तरी चालेल पण सर्वांना सुखरूप बाहेर काढण्याचे पूर्ण प्रयत्न होईल,’ असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version