Monsoon Hair Care Tips : पावसाळा सुरू झाला की, केसांची काळजी घेणे गरजेचे असते. हवामान बदलामुळे केसांमध्ये चिकटपणा, कोंडा, खाज तसेच केस गळण्यास सुरुवात होते. पण सतत पावसात भिजल्याने केस रखरखीत होऊ लागतात. त्यामुळे पावसाळ्यात केस निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी केसांची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.
1. पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी?
पावसाळ्यात केस गळणे, कोंडा आणि केसांमध्ये चिकटपणा सतत वाढत असतो. ते कमी करण्यासाठी पावसाळ्यात केसांची योग्य काळजी घेणे गरजेचे असते. जाणून घ्या सोप्या टिप्स.
2. पावसाळ्यात केसं ओले ठेवू नये
पावसाळ्यात केसं जास्त वेळ ओले ठेवू नका. केस जर ओले असतील तर शक्य तितक्या लवकर सुक्या टॉवेलने पुसून घ्या.
3. ओले केस बांधू नये
ओले केस जास्त वेळ बांधून ठेवल्यास स्कॅल्पवर ओलावा आणि घाम साचू शकतो. त्यामुळे कोंडा आणि केसांत खाज येऊ शकते.
4. शॅम्पूने केस धुणे
पावसाळ्यात स्कॅल्पवर तेलकटपणा वाढू शकतो. त्यामुळे शॅम्पूने केस स्वच्छ धुवा. मात्र, रोज शॅम्पू करण्याची गरज नाही.
5. कंडिशनर लावा
केस शॅम्पूने धुतल्यानंतर केसांच्या लांबीवर कंडिशनर लावा. कंडिशनर केसांचा कोरडेपणा आणि गुंता कमी होण्यास मदत करते.
6. ओल्या केसांवर कंगवा फिरवू नये
ओले केस नाजूक असतात त्यावर लगेच कंगवा फिरवल्यामुळे केस तुटण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे केस पूर्णपणे सुकल्यानंतर कंगव्याचा वापर करावा.
7. केस सुकवतान काळजी घेणे
केस मऊ टॉवेलने हलक्या हाताने पुसावे जेणेकरुन केसामधील पाणी निघून जाण्यास मदत होईल. शक्य असल्यास केस नैसर्गिकरित्या सुकू द्या.
पावसाळ्यात केसांचा ओलेपणा टाळायचा असेल तर, वरील सर्व गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच केसगळती किंवा स्कॅल्पच्या समस्या जास्त जाणवत असतील तर, तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.