अबू आझमी यांचं गृहमंत्र्यांना पत्र

अबू आझमी यांचं गृहमंत्र्यांना पत्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांच्या भोंग्याच्या मुद्यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत असून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. या बैठकीस भाजपने बहिष्कार टाकला. अशातच समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. भोंग्या संदर्भातील बैठकीबाबत आझमी यांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

अबू आझमी यांनी पत्रात लिहिले की, समाजकंटकांमुळे मुंबई शहरातील शांततापूर्ण वातावरण बिघडवले जात आहे. रमजान महिन्यात मुसलमान नागरिक कमी असलेल्या भागात मशिदींसमोर मुद्दाम ‘जय श्री राम’च्या घोषणा देत गाणी वाजवणे जेणेकरून नागरिक चिडतील आणि आपसात भांडतील. त्यामुळे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे मागमी करतो की या घटनांना जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी अबू आझमी यांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहीत केली आहे.

मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. मात्र, सर्वपक्षीय बैठकीस भाजपने बहिष्कार टाकत बैठकिला उपस्थित न राहण्याचा निर्णय  घेतला. या बैठकीत भाजपचा कोणीही प्रतिनिधी सहभागी झाला नसून बिनाधिकारी गृहमंत्र्यांच्या बैठकीला का जायचे? असाही सवाल फडणवीसांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे बैठकीसाठी आपल्या पक्षाचे प्रतिनिधी पाठवले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version