अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील कोयलारी-पाचडोंगरी गावातील नागरिक विहरीतील दूषित पाणी पिल्याने गावात कॉलराची साथ आली आहे तर यामध्ये चार आदिवासींचा मृत्यू झाला आहे. चौघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. चारशेच्या वर ग्रामस्थ आजारी पडले आहेत .सहा दिवस उलटून गेले तरी देखील फारशी परिस्थिती नियंत्रणात नाही. दवाखान्यापुढे पोलिसांचा २४ तास बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात उपचार सुरू आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने बेड तसेच मोबाईल टॉयलेट स्वच्छता, स्वच्छ पाणी, योग्य औषधोपचार, औषधसाठा परिपूर्ण या ठिकाणी सध्या आहे. याठिकाणी संपूर्ण जिल्हा प्रशासन पाच दिवसापासून तळ ठोकून असून हळूहळु परिस्थिती नियंत्रणात येत आहे. सध्या या आदिवासी बांधवांवर चुरणी, काटकुंभ येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पाचडोंगरी येथील जिल्हापरिषद शाळेत तात्पुरता स्वरुपाचे रुग्णालयात उभारण्यात आले आहे.या साथीच्या आजाराने जवळपास शंभर रुग्ण आजारी पडले आहेत. यातच चार जणांचा मृत्यू देखील झाला आहे. दरम्यान आजारी असलेल्या रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे
आतापर्यंत ४०० रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत . थोडे उपचार झाल्यावर आदिवासी लगेच घरी घेऊन जातात. त्यामुळे रुग्णालयापुढे आता पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तर आता हळूहळु परिस्थिती नियंत्रणात येत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.