परगावात मजुरीला गेलेल्या कुटुंबाचे घर पेटवलं

परगावात मजुरीला गेलेल्या कुटुंबाचे घर पेटवलं

ऊसतोडणी मजुरांची व्यथा ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीद्वारे जगासमोर

महाराष्ट्रात ठिकठिकाणी मजुरांवर अन्याय होत आहे. नंदुरबार जिल्ह्यात अशीच एक भयानक घटना घडली आहे. जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील पीवटी गावातील ईश्वर वसावे आणि सुशीला वसावे या ऊसतोडणी मजुरांच्या घरादाराची राखरांगोळी करण्यात आली. हे परगावात मजुरीला गेलेल्या या वसावे कुटुंबाचे घर पेटवण्यात आले आहे. या घटनेमध्ये त्यांचा संसार जळून खाक झाला आहे. नंदुरबार येथील मागील आठवड्यात घडलेली ही घटना ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीने उघडकीस केली आहे.

वसावे दाम्पत्य ऊसतोडणीसाठी सोलापुरात गेले असता ही घटना घडली. या घटनेत त्यांची गुरे भाजली आहेत आणि घरातील इतर नातेवाईकांनाही इजा पोहचल्याचे समोर येत असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आपल्या गावचा मजूर परगावात मजुरीला जातोच कसा या मुद्द्यावर वसावे कुटुंबाचा असा छळ केल्याचे सांगण्यात येत असून संबंधित कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version