मराठी साहित्य संमेलनाचे आकर्षण म्हणजे ‘अभिजात मराठी साहित्य प्रदर्शन’

मराठी साहित्य संमेलनाचे आकर्षण म्हणजे ‘अभिजात मराठी साहित्य प्रदर्शन’

नाशिकमध्ये ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शुक्रवारपासून सुरवात झाली आहे. मराठी साहित्य संमेलनाचा शनिवारी दुसरा दिवस आहे. साहित्य संमेलनाचे खास आकर्षण ठरत आहे ते म्हणजे अभिजात मराठी साहित्य प्रदर्शनाचे दालन. या प्रदर्शनामध्ये मराठी साहित्य किती पुरातन आहे आणि या भाषेला अभिजात दर्जा देण्याची आवश्यकता का आहे, याचे पुरावे सादर करण्यात आले आहेत. तसेच या ठिकाणी येणारे मराठी नागरिक हे राष्ट्रपतींना पत्र लिहून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी करत आहेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला राज्याच्या कानाकोपऱ्यातुन साहित्यिक, कवी लेखक दाखल झाले आहेत. याच कवी संमेलनामध्ये रेकॉर्डब्रेक कविकट्टा सुरू असून, साहित्य संमेलनाच्या उद्घाटनापासून ते समारोपापर्यंत हा कवी कट्टा सुरू राहणार आहे. अव्याहतपणे सुरु राहणारा हा कवी कट्टा रेकॉर्ड नोंदवत संमेलनात येणाऱ्या रसिकांच आकर्षण ठरतो आहे. राज्यभरातून आलेले कवी या कार्यक्रमात आपल्या कविता सादर करत आहेत.

कुसुमाग्रज स्मारकापासून काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीने या संमेलनाला सुरुवात झाली. आडगाव परिसरातील एमईटी महाविद्यालयामध्ये होत असलेल्या या संमेलन परिसरात तब्बल अडीचशे पुस्तकांचे स्टॉल्स आहेत. या स्टॉल्समध्ये लाखो पुस्तक संमेलनाला येणाऱ्या रसिकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. संमेलनातील या स्टॉल्सवर पुस्तक खरेदी करण्यासाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पुस्तकांच्या विक्रीतून तब्बल तीन ते साडेतीन कोटी रुपयांचा उलाढाल होण्याची विक्रेत्यांची अपेक्षा आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version