जन्मदाताच बनला मुलाचा मारेकरी

जन्मदाताच बनला मुलाचा मारेकरी

औरंगाबाद शहरात संतापजनक प्रकार समोर आला असून, दुहेरी हत्याकांडानं औरंगाबाद जिल्हा हादरलं आहे. चारित्र्याच्या संशयावरून एकाने निर्दयी व्यक्तीने आपल्या पत्नीसह अडीच वर्षांच्या मुलाची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. समीर मस्के असं हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे.

ही घटना औरंगाबाद शहरातील कांचनवाडी भागात घडली. सातारा पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे. आरोपीच्या आईचाही यामध्ये समावेश आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली. चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा आणि अडीच वर्षाच्या बाळाचा गळा आवळून खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. दरम्यान घटना घडल्यानंतर आरोपीने खुद्द पहाटे २ वाजता पोलिसांना आपण खून कलेल्याची माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. या दुहेरी हत्याकांडाने औरंगाबाद जिल्हा हादरलं आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोबाईल चार्जरच्या वायरने पतीने पत्नीसह अडीच वर्षांच्या मुलाची गळा आवळून हत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला अटक केली आहे. सातारा पोलीस ठाणे हद्दीतील कांचनवाडी परिसरात आरोपी हा आपल्या पत्नी आणि मुलासह राहत होता. मात्र आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर तो नेहमी संशय घेत होता. यावरून अनेकदा त्यांच्यात वाद देखील होत होता. यावरूनच काल पुन्हा जोरदार वाद झाले आणि याच रागाच्या भरात पतीने पत्नी आणि मुलगा यांची गळा आवळून हत्या केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version