गेल्या अनेक दिवसांपासून आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेला ‘धुरंधर’ सिनेमा 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा केवळ अॅक्शन चित्रपट नाही तर हेरगिरी, थ्रिलर आणि धोकादायक मोहिमांची कहाणी आहे, ज्याचा प्रत्येक दृश्य थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेला आहे. ‘धुरंधर’ त्याच्या अॅक्शन- पॅक्ड स्टोरी, गाणी, ट्रॅक आणि कलाकारांच्या दमदार अभिनयाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे .
हा चित्रपट लवकरच 100 कोटींचा आकडा ओलांडेल अशी अपेक्षा आहे. अशातच ‘धुरंधर’ चित्रपटात हिरो पेक्षा विलनच्या एन्ट्रीसाठी प्रेक्षकवर्ग जास्त प्रमाणात वेडा झाल्याचं पाहायला मिळत आहे. ‘धुरंधर’ मधील अक्षय खन्नाच्या क्लासी लूकने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे, त्याच्या एन्ट्री बीजीएमनं सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. छावामध्ये राक्षसी मुघल शासक औरंगजेबाची भूमिका साकारल्यानंतर, अक्षय खन्ना नुकत्याच प्रदर्शित झालेल्या धुरंधरमध्ये सहजतेने रहमान डकैतच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. ‘धुरंधर’ मधील “गेहरा हुआ” पासून “इश्क जलकर” पर्यंतच्या गाण्यांनी बरीच चर्चा निर्माण केली आहे. या सर्वांपलिकडे अक्षय खन्नाच्या एन्ट्रीच्या वेळी वाजणाऱ्या बीजीएम एक वेगळाच चाहतावर्ग निर्माण केला आहे.
बॉबी देओलने ‘ अॅनिमल’ चित्रपटात एका शक्तिशाली खलनायकाची भूमिका साकारली होती. ‘ अॅनिमल ‘ मधील बॉबी देओलच्या एन्ट्रीमधील इराणी गाण ‘जमाल कुडू’ ने सर्वांना मोहित केल होत. त्यानंतर आता ‘धुरंधर’ अक्षय खन्नाच्या दृश्यातही हाच स्वॅग दिसत असून या गाण्याला चाहत्यांचा मोठा वर्ग आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
‘धुरंधर’ मधील FA9LA गाण बहरीनी अरबी आहे, याचा उच्चार फासला असा केला जातो. हुसम असीम यांनी गायलेले हे गाणे 2024 मध्ये प्रदर्शित झाले. बहरीनी भाषेत, हा शब्द ‘मजेचा वेळ’ किंवा ‘पार्टी’ दर्शवतो. FA9LA हे गाणे फ्लिपेराची यांनी लिहिले आहे. या गाण्याला आतापर्यंत 7 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. धुरंधर टीमने चित्रपटासाठी या गाण्याचे पुनर्व्याख्यान केले आहे. अक्षय खन्ना गाण्यावर हसत आणि नाचताना दिसत आहे . हा सीन इतका शक्तिशाली आहे की लोक या गाण्याची तुलना अॅनिमलमधील “जमाल कुडू ” ट्रॅकशी करत आहेत. “धुरंधर” मध्ये, अक्षय खन्ना रहमान द डकैतीची भूमिका साकारत असून रहमान द डकैतीच्या प्रवेशादरम्यान एक बहरीनी गाणे वाजते. हे गाण सोशल मीडियावर “रहमान द डकैती एन्ट्री सॉन्ग ” म्हणून खूप लोकप्रिय होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.