स्वाभिमानी शेतकरी संघटना मविआसोबत काडीमोड घेणार?

स्वाभिमानी शेतकरी संघटना मविआसोबत काडीमोड घेणार?

माजी खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीसोबत काडीमोड घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येत्या ५ एप्रिल रोजी कोल्हापुरात स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारणीची बैठक पार पडणार आहे. या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत स्वाभिमान शेतकरी संघटना मविआसोबत काडीमोड घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना मविआसोबत काडीमोड घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे स्वाभिमानीची वाटचाल भाजपशी युती होण्याचा दिशेने होऊ शकते. मात्र, राज्य कार्यकारणीच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार सत्तेत आल्यापासून पक्षाच्या संपर्कात नाही. तर २४ मार्च रोजी राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर हे वरुड-मोर्शीतील हिवरखेड येथे सभा घेणार आहेत. मात्र, या सभेत देवेंद्र भुयार यांना निमंत्रण नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version