Vidhan Parishad Election : विधानपरिषदेसाठी सेना-भाजपात खलबतं, 5 जागांसाठी शिवसेना आग्रही; संभाव्य उमेदवारांची यादी समोर

Vidhan Parishad Election : विधानपरिषदेसाठी सेना-भाजपात खलबतं, 5 जागांसाठी शिवसेना आग्रही; संभाव्य उमेदवारांची यादी समोर

मुंबई : सध्या राज्याच्या राजकारणात विधानपरिषद निवडणुकीवरून खलबतं सुरू असून महायुतीच्या जागावाटपाचा तिढा मात्र अजूनही सुटलेला नाही. अद्याप महायुतीकडून जागावाटप जाहीर झाले नसून पक्षश्रेष्ठींची वाटाघाटी सुरू असल्याचे समजते. नुकतेच शिवसेना पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन भाजप नेते, गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळीदेखील विधानपरिषद निवडणुकीच्या जागावाटपावरून चर्चा झाल्याचे समजते. तसेच भाजपने दिलेला महायुतीचा 12 – 4 – 1 चा फॉर्म्युला शिवसेनेला अमान्य असल्याचेही सांगितले जात आहे. विधान परिषदेवर शिवसेनेच्या वाट्याला आत्तापर्यंत 4 जागा आहेत.    

ठाकरेंची शिवसेना सोडून भाजपसोबत आल्यानंतर शिवसेनेला सापत्य वागणूक दिली जात असल्याचा तसेच सत्तेत सगळ्यात कमी वाटा दिला जात असल्याची खंत एकनाथ शिंदे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन करणार असल्याचे सूत्रांकडून समजते. 

शिवसेनेला सुटलेल्या जागा – 

ठाणे
नाशिक 
यवतमाळ 
परभणी

राष्ट्रवादी काँग्रेस  –

रायगड-रत्नागिरी -सिंधुदुर्ग

भाजप – 

नागपूर, वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर – जालना, सातारा – सांगली, पुणे, जळगाव, नांदेड, भंडारा – गोंदिया, अमरावती, लातूर – धाराशीव – बीड, सोलापूर, अहिल्यानगर

हेही वाचा : Prajakt Tanpure : मोठी बातमी! राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे करणार भाजपमध्ये प्रवेश, शरद पवार गटाला धक्का; प्रवेशाची तारीखही ठरली

दरम्यान, शिवसेनेला पाच जागा मिळाव्यात आणि सहावी जागा छत्रपती संभाजी नगर किंवा रायगड ही मेरिटच्या आधारे जिल्ह्यातील राजकीय बलाबल पाहता मिळावी, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने केली जात आहे. त्यानुसार जागावाटप झाल्यास पुढील संभाव्य नावे समोर येत आहेत. 

ठाणे – पालघर : रविंद्र फाटक नाव जवळपास निश्चित
हिंगोली – परभणी : अभिमन्यु खोतकर किंवा बिप्लव बजोरीया 
छत्रपती संभाजी नगर : राजेंद्र जंजाळ किंवा बाजीराव चव्हाण 
नाशिक : हेमंत गोडसे, सईद खान, भाऊसाहेब चौधरी 
रायगड : विकास गोगावले, भरत गोगावले यांचे सुपुत्र 
जळगाव : प्रतापराव पाटील, गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version