आरबीआयमध्ये पदवीधर तरुणांना नोकरीची संधी

आरबीआयमध्ये पदवीधर तरुणांना नोकरीची संधी

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही महत्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयमध्ये 926 जागांसाठी पदभरती करण्यात येत आहे.

सहाय्यक पदासाठी ही जागा असणार आहे.

या पदासाठी अर्ज करण्याची सुरुवात 23 डिसेंबरपासून झाली आहे. तर 16 जानेवारी 2020 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

सहाय्यक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षादरम्यान असायला हवे.

या पदासाठी अर्ज करणारा अर्जदार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असायला हवा. तसेच त्या अर्जदाराला पदवीला किमान 50 टक्के गुण असायला हवे. तसेच संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या, इडबल्यू आणि इमाव (OBC)प्रवर्गातील उमेदवारांना 450 रुपये अर्ज शुल्क असणार आहे. तर एससी, एसटी, पीडब्लूडी आणि माजी सैनिकांसाठी 50 रुपये इतके अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.

सहाय्यक पदासाठीची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

अर्ज करण्यासाठी क्लिक करा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version