कराकस : युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, व्हेनेझुएला देशाची राजधानी असलेल्या कराकसपासून पश्चिमेकडे सुमारे 160 किलोमीटर अंतरावर 7.2 तीव्रतेचा भूकंप झाला. त्यानंतर अवघ्या 39 सेकंदांनी 7.5 तीव्रतेचा अधिक शक्तिशाली भूकंप झाला. USGS ने या घटनेचे वर्णन ‘दुर्मिळ सिस्मिक डबलट’ (एकापाठोपाठ एक झालेले दोन भूकंप) असे केले आहे. USGS ने पहिल्या भूकंपाची तीव्रता 7.1 वरून 7.2 अशी सुधारित केली. तसेच त्यांनी इशारा दिला की, “या भूकंपामुले मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. ही आपत्ती व्यापक स्वरूपाची असू शकते.” संस्थेच्या प्राथमिक अंदाजानुसार, मृतांची संख्या 10 हजार ते एक लाखाच्या दरम्यान असू शकते. व्हेनेझुएलाच्या अंतरिम राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी बुधवारी आणीबाणी जाहीर केली आहे. या भूकंपामुळे कराकस आणि इतर भागांत इमारती कोसळल्या असून वीज खंडित झाल्याचे सांगितले जात आहे. या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाले असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
Mi corazón, mi abrazo infinito y mis oraciones están con cada hogar venezolano en estas horas de angustia. Que la fortaleza, la serenidad y la solidaridad prevalezcan entre nosotros ante este difícil momento. Que Dios proteja a cada venezolano, a nuestras familias y a… — María Corina Machado (@MariaCorinaYA) June 24, 2026
Immense damage seen to buildings across Venezuela’s capital of Caracas, following what now appears to have been a “double-event” 7.2 and 7.5 magnitude earthquake back-to-back near the coast in Northern Venezuela, according to the U.S. Geological Survey (USGS). pic.twitter.com/XoG2jSJMf2 — OSINTdefender (@sentdefender) June 24, 2026
Passengers panic and run for cover at Simón Bolívar International Airport in Maiquetía, Venezuela, as the terminal shakes and power flickers, resulting from a massive 7.5 magnitude earthquake off the coast of Caracas. pic.twitter.com/uWN4ZqFjOZ — OSINTdefender (@sentdefender) June 24, 2026
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.