मुंबई : ॲपलच्या बहुप्रतीक्षित आयफोन 17 सिरीजची विक्री आजपासून भारतात सुरू झाली असून तंत्रज्ञानप्रेमी ग्राहकांमध्ये जबरदस्त उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) आणि दिल्लीच्या साकेत येथील ॲपल स्टोअर्सबाहेर सकाळपासूनच मोठ्या रांगा लागल्या. काही ग्राहकांनी तर नवीन आयफोन मिळवण्यासाठी रात्रीपासूनच स्टोअरबाहेर थांबण्याचा पर्याय निवडला.
नवीन मालिकेत आयफोन 17, आयफोन एअर, आयफोन 17 प्रो आणि आयफोन 17 प्रो मॅक्स अशी चार मॉडेल्स उपलब्ध झाली आहेत. मागील सिरीजच्या तुलनेत या वेळी कंपनीने बेस व्हेरिएंट थेट 256GB स्टोरेजसह उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे किंमत थोडी जास्त असली तरी ग्राहकांना अधिक स्टोरेजची सुविधा मिळते.
भारतातील आयफोन 17 सिरीजचे दर
आयफोन 17
256GB – Rs.82,900
512GB – Rs.1,02,900
आयफोन एअर
256GB – Rs.1,19,900
512GB – Rs.1,39,900
1TB – Rs.1,59,900
आयफोन 17 प्रो
256GB – Rs.1,34,900
512GB – Rs.1,54,900
1TB – Rs.1,74,900
आयफोन 17 प्रो मॅक्स
256GB – Rs.1,49,900
512GB – Rs.1,69,900
1TB – Rs.1,89,900
2TB – Rs.2,29,900
या किंमतींमुळे आयफोन 17 सिरीज प्रीमियम श्रेणीत मोडते, मात्र नव्या फिचर्स, दमदार प्रोसेसर आणि सुधारित कॅमेरा सिस्टीममुळे ग्राहकांचा ओढा आयफोन 17 च्या सिरीजकडे स्पष्टपणे दिसत आहे.
#WATCH | Mumbai | A customer from Ahmedabad, Manoj says, "I come from Ahmedabad every time… I have been waiting since 5 AM…" https://t.co/mqGcKzpl6t pic.twitter.com/cd2E1P4fbr — ANI (@ANI) September 19, 2025
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.