राणा दाम्पत्यांनी दिवाळी आनंदपूर्वक साजरी व्हावी यासाठी स्वतः पुढाकार घेतला आहे. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा मेळघाटातील गोर-गरीब आणि गरजूंच्या जीवनात दिवाळीचा गोडवा निर्माण करणार आहेत. मेळघाटातील १ लाख गरीब कुटुंबियांना आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा मोफत किराणा वाटप करणार आहे.
‘किराणा किट पॅकिंगचे काम युद्धस्तरावर सुरू असून आदिवासीसंह अमरावतीतील १ लाख गरजू कुटुंबियांच्या घरी मोफत किराणा पोहचवणार असल्याचे’ खासदार नवनीत राणा यांनी सांगितले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.