छगन भुजबळ यांच्या घराबाहेर काढली ‘काळी रांगोळी’

छगन भुजबळ यांच्या घराबाहेर काढली ‘काळी रांगोळी’

नवीन विद्यापीठ विधेयक मागे घेण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चा युवती विभाग नाशिक महानगराने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाबाहेर काळी रांगोळी काढून निषेद व्यक्त केला आहे.

विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करणारे विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक महाविकास आघाडी सरकारने मुद्दाम घाई घाईने पारित करून घेतले. या माध्यमातून प्र.कुलपती हे नवीन पद तयार करून कुलपतींचे अधिकार उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांना दिले जाणार आहेत. विद्यापीठांना राजकारणाचा अड्डा बनविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात असल्याचा आरोप करत नवीन विद्यापीठाच्या विधेयकाचा निषेध करण्यात आला.

त्यामुळे या विधेयकाला विरोध म्हणून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाबाहेर काळी रांगोळी काढून निषेध व्यक्त करण्यात आला. या निषेधार्थ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना १० लाख पत्र पाठवण्यात आले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version