India Oil Crisis: जागतिक तेल संकटात भारताचा मास्टरस्ट्रोक! थार प्लॅन ॲक्टिव्ह, उत्पादनात मोठी वाढ

हॉर्मुझ संकटामुळे जागतिक तेल पुरवठा ढासळत असताना भारताने थार वाळवंटातील उत्पादन वाढवून ऊर्जा सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले असून पुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे
India Oil Crisis: जागतिक तेल संकटात भारताचा मास्टरस्ट्रोक! थार प्लॅन ॲक्टिव्ह, उत्पादनात मोठी वाढ

India Oil Crisis: पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे आणि अमेरिका-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हॉर्मुझ सामुद्रधुनीत निर्माण झालेल्या अडचणीमुळे जगभरात तेल आणि गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. पाकिस्तान, बांग्लादेश, व्हिएतनाम आणि ब्रिटनसारख्या देशांनाही या संकटाचा फटका बसला आहे. भारतातही या परिस्थितीचे पडसाद उमटले असले, तरी केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना करत ‘थार प्लॅन’ सक्रिय केला आहे.

या योजनेअंतर्गत राजस्थानातील थार वाळवंटातील तेलक्षेत्रांमधून कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. सरकारी मालकीची ऑइल इंडिया लिमिटेड कंपनी या कामात आघाडीवर आहे. जोधपूर सँडस्टोन क्षेत्रातून आता दररोज मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाचे उत्पादन होत असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

हेही वाचा: Mojtaba Khamenei: इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी पदभार स्विकारल्यानंतर गायब, जिवंत आहेत की नाहीत?चर्चांना उधाण

जैसलमेर परिसरातील बागेवाला तेलक्षेत्र या उत्पादनवाढीचे मुख्य केंद्र ठरत आहे. येथून काढलेले कच्चे तेल टँकरच्या माध्यमातून गुजरातमधील मेहसाणा येथे पोहोचवले जाते. तेथे त्यावर प्रक्रिया करून पाइपलाइनद्वारे कोयाली रिफायनरीपर्यंत पाठवले जाते. या संपूर्ण प्रक्रियेमुळे देशांतर्गत तेल पुरवठा कायम ठेवण्यास मदत होत आहे.

आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये राजस्थानातील तेलक्षेत्रातून सुमारे 43,773 मेट्रिक टन कच्च्या तेलाचे उत्पादन झाले आहे. मागील वर्षी हे उत्पादन 32,787 मेट्रिक टन होते. म्हणजेच उत्पादनात लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट होते. हॉर्मुझ सामुद्रधुनीत अडथळे निर्माण झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असताना भारताने स्वदेशी उत्पादन वाढवून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला आहे.

बिकानेर-नागौर उपखोऱ्यातील बागेवाला तेलक्षेत्राचा शोध 1991 साली लागला होता. सुमारे 200 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या या भागात एकूण 52 विहिरी असून त्यापैकी 33 सध्या कार्यरत आहेत. उत्पादन वाढवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. विशेषतः CSS (सायक्लिक स्टीम स्टिम्युलेशन) तंत्रज्ञानामुळे तेल काढण्याची कार्यक्षमता वाढली आहे. याशिवाय, जाड कच्च्या तेलासाठी डायल्यूएंट आणि आर्टिफिशियल लिफ्ट सिस्टीमचा वापर केला जात आहे.

हेही वाचा: '..तर नरकाचे दरवाजे', इराण गुरगुरला; अमेरिकेच्या 48 तासांच्या मुदतीला कचऱ्याची पेटी दाखवत थेट अणुयुद्धाची धमकी

देशातील रिफायनरीज पूर्ण क्षमतेने सुरू आहेत आणि कच्च्या तेलाचा साठा समाधानकारक असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचेही सांगण्यात आले आहे. पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत राहणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

जागतिक संकटाच्या काळात भारताने ‘थार प्लॅन’च्या माध्यमातून ऊर्जा सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. स्वदेशी उत्पादन वाढवून आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचा हा प्रयत्न भविष्यात देशासाठी फायदेशीर ठरणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version