Dhurandhar Rapper Flipperachi : रहमान डकैतच्या एन्ट्रीचं रॅप गाणाऱ्याने अद्याप ‘धुरंधर’ पाहिलाच नाही; कारणही आलं समोर

'धुरंधर' चित्रपटात हिरो पेक्षा विलनच्या एन्ट्रीसाठी प्रेक्षकवर्ग जास्त प्रमाणात वेडा झाल्याचं पाहायला मिळत आहे. रॅपर फ्लिपेराचीने सांगितले की त्याने अद्याप धुरंधर हा चित्रपट पाहिलेला नाही.
Dhurandhar Rapper Flipperachi : रहमान डकैतच्या एन्ट्रीचं रॅप गाणाऱ्याने अद्याप ‘धुरंधर’ पाहिलाच नाही; कारणही आलं समोर

'धुरंधर' चित्रपटात हिरो पेक्षा विलनच्या एन्ट्रीसाठी प्रेक्षकवर्ग जास्त प्रमाणात वेडा झाल्याचं पाहायला मिळत आहे. 'धुरंधर' मधील अक्षय खन्नाच्या क्लासी लूकने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे, त्याच्या एन्ट्री सॉन्गने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. धुरंधर चित्रपटातील अक्षय खन्नाने साकारलेल्या रहमान डकेटच्या एन्ट्री सॉन्गमुळे 'FA9LA' हे गाणे रातोरात व्हायरल झाले. हे गाणे रॅपर फ्लिपेराची यांनी लिहिले असून या गाण्याला धुरंधर चित्रपटामुळे तो प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला आहे.

हेही वाचा- Dhurandhar Banned : 'धुरंधर'ला धक्का; सहा देशांत बंदी, कारण ऐकून होईल संताप

दरम्यान 'FA9LA' या गाण्याच्या गायकाने अलीकडेच एक खुलासा केला आहे. रॅपर फ्लिपेराचीने सांगितले की त्याने अद्याप धुरंधर हा चित्रपट पाहिलेला नाही. यामागचं कारण त्याने एका मुलाखतीत बोलताना सांगितले. यावेळी रॅपर फ्लिपेराची म्हणाला की, तो धुरंधर चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. चित्रपटातील त्याच्या गाण्याला रील्सवर मिळत असलेल्या प्रेमाने तो भारावून गेला आहे. मात्र दुर्दैवाने, तो अद्याप चित्रपट पाहू शकलेला नाही. यामागचं कारण असं की, फ्लिपेराची बहरीनचा रहिवासी आहे आणि तो ज्याठिकाणी राहतो त्या देशामध्ये धुरंधर चित्रपटावर बंदी घातली आहे. तरी देखील त्याला हा चित्रपट लवकरात लवकर पहायचा आहे. 

हेही वाचा- 'Dhurandhar' Record : 'धुरंधर'चा ऐतिहासिक विक्रम; नेटफ्लिक्ससोबत 285 कोटींची डील, 'पुष्पा 2' चा रेकॉर्ड मोडला

‘धुरंधर’ला मध्यपूर्वेतील सहा देशांमध्ये प्रदर्शित करण्यास पूर्ण मनाई करण्यात आली.  ज्यात बहरीन, कुवैत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमीरात याे देशांचा समावेश होता. या सहा देशांनी ‘धुरंधर’ला स्थानिक सेन्सॉर बोर्डांकडून मंजुरी नाकारली आहे. ज्यामुळे या देशांमध्ये चित्रपटाचा एकही शो झाला नाही. तरीही भारतातील प्रेक्षकांकडून मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता, चित्रपटाची लोकप्रियता कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.‘धुरंधर’वरून निर्माण झालेली ही आंतरराष्ट्रीय चर्चा मात्र चित्रपटाला आणखी जास्त प्रसिद्धी देत आहे. 

हेही वाचा- 'Dhurandhar' Akshaye Khanna Entry BGM : बॉबी देओलनंतर आता अक्षय खन्नाच्या धुरंदरमधील एन्ट्री बीजीएमनं प्रेक्षकांना लावलं वेडं; औरंगजेबनंतर रेहमान डकैतचीही चर्चा

फ्लिपेराची हा बहरीनी-मोरोक्कन वंशाचा कलाकार आहे. फ्लिपेराचीचे खरे नाव हुसम असीम असून फ्लिपेरा हे त्याचे चाहत्यांसाठीचे नाव आहे. फ्लिपेराची खलीजी शैलीमध्ये रॅप तयार करतो, जी अरबी-आखाती प्रदेशातील रॅप गाण्यांचे आणि आधुनिक बीट्सचे मिश्रण आहे. तसेच धुरंधरच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटाने जगभरात 700 कोटींचा आकडा पार केला. मात्र 14 व्या दिवशी चित्रपटाची आतापर्यंत सर्वात कमी कमाई झाली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version