Rupali Chakankar : गुवाहाटी दौरा, आर्थिक व्यवहार, खरात प्रकरण…; ईडीच्या चौकशीनंतर रुपाली चाकणकरांनी माध्यमांसमोर दिलं स्पष्टीकरण

भोंदू अशोक खरातप्रकरणी रुपाली चाकणकर यांची ईडीकडून आठ तास चौकशी करण्यात आली.
Rupali Chakankar : गुवाहाटी दौरा, आर्थिक व्यवहार, खरात प्रकरण…; ईडीच्या चौकशीनंतर रुपाली चाकणकरांनी माध्यमांसमोर दिलं स्पष्टीकरण

मुंबई : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची जवळीकता असल्याने त्यांचेही नाव यातील आर्थिक व्यवहारांशी जोडले गेले आहे. यासंदर्भात काल, गुरुवारी रुपाली चाकणकर यांची ईडीमार्फत तब्बल आठ तास चौकशी करण्यात आली. भोंदू खरातची प्रकरणं सोशल माध्यमांमध्ये उघड झाल्यानंतर रुपाली चाकणकर यांचे खरातच्या कुटुंबीयांसोबतचे काही फोटोदेखील माध्यमांसमोर आले. त्यानंतरपासूनच चाकणकर यांचे या प्रकरणाशी नाव जोडले गेले. परिणामी, चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. रुपाली चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबाचे अशोक खरात याच्याबरोबर काही आर्थिक संबंध आहेत का?, चाकणकर-खरात यांनी भागिदारीत काही मालमत्ता घेतल्या आहेत का?, अशा अनुषंगाने कालच्या चौकशीत ईडीने रुपाली चाकणकर यांच्यावर प्रश्नांचा मारा केला. परंतु आमच्या कुटुंबाचे अशोक खरात याच्यासोबत कोणतेही आर्थिक संबंध नव्हते आणि आमच्यात जमिनीचे देखील व्यवहार झालेले नाहीत, असे चौकशीनंतर रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : Anand Paranjape: 12 वर्षानंतर आनंद परांजपे यांची शिवसेनेत घरवापसी…; पक्षप्रवेशानंतर पहिली प्रतिक्रिया समोर

ईडीकडून झालेल्या चौकशीनंतर रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खरातसोबतच्या गुवाहाटी दौऱ्यावरही स्पष्टीकरण दिले. चाकणकर म्हणाल्या की, अशोक खरात आणि आमच्या कुटुंबाचा गुवाहाटीचा फोटो प्रसिद्ध होत आहे. माझ्या फॅमिलीसोबत खरातची फॅमिली आहे. त्याच्यासोबत आम्ही प्रवास केलेला नाही. खरात त्याच्या फॅमिलीसोबत, अनेक ट्रस्टी मेंम्बर्सबरोबर गुवाहाटीला गेला होता. त्यानंतर आम्ही तिथे पोहोचलो. त्यावेळी आमचा भाव असा होता की आपल्याला आपल्या गुरूबरोबर दर्शन करायला मिळते आहे, तो अध्यात्मिक भाव होता. आम्ही पुण्यावरून प्रवास करून गेलो होतो. तिथे सोबत आम्ही दर्शन केले. त्यानंतर त्यांचा प्रवास त्यांच्या लोकांसोबत होता. खरात अनेक लोकांबरोबर, तिथे दर्शनासाठी आलेला होता.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version