इंधनदरवाढ, महागाईविरोधात डोंबिवलीत आंदोलन

इंधनदरवाढ, महागाईविरोधात डोंबिवलीत आंदोलन

  देशात पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. पेट्रोलने ११५ रुपयांचा टप्पा पार केला आहे. तसेच गॅस, खाद्य पदार्थांच्या किंमतीतही वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र कात्री लागत आहे. यासर्वाची झळ ही सामान्य माणसाला बसत आहे. त्यामुळे इंधन, गॅस, खाद्यपदार्थ दरवाधी विरोधात डोंबिवलीत शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

 इंधन, गॅस, खाद्यपदार्थ यांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे शिवसेना आणि युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात सायकलवर रॅली काढत ‘मोदी सरकार हे महागाई सरकार’ अशा घोषणा केल्या. लवकरात लवकर इंधन दरवाड कमी करण्याची मागणी यावेळी शिवसैनिकांकडून करण्यात आली.

 देशात कोरोनाग्रस्त परिस्थिती काही प्रमाणात स्थिरावली आहे. अशातच भारताने शंभर कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. मात्र दुसरीकडे इंधनदरवाढीने मोठी झेप घेतली आहे. देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version