Bhushan Pradhan Engagement: मराठी मनोरंजन विश्वातून एक आनंदाची आणि तितकीच चर्चेची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेता भूषण प्रधान याने नुकत्याच केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अभिनेत्याने कोणालाही कल्पना न देता साखरपुडा उरकला असल्याची चर्चा रंगली असून, त्याने थेट लग्नाची तारीखही जाहीर केली आहे.
भूषण प्रधानने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो एका तरुणीसोबत अतिशय रोमँटिक अंदाजात दिसत आहे. विशेष म्हणजे, दोघांच्या हातात साखरपुड्याच्या अंगठ्या स्पष्टपणे दिसत असल्यामुळे त्यांच्या नात्याबाबत अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. फोटोमध्ये तरुणीचा चेहरा स्पष्ट दिसत नसला, तरी भूषणचा चेहरा आनंदाने उजळलेला दिसतो.
या फोटोसोबत त्याने ’24 जुलै 2026 ही तारीख लक्षात ठेवा” असा कॅप्शन देत चाहत्यांना एक मोठा संकेत दिला आहे. यामुळे आता भूषण लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे.
या पोस्टवर चाहत्यांसह अनेक कलाकारांनीही कमेंट्स करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर हिनेही या पोस्टवर प्रतिक्रिया देत अभिनेत्याचे अभिनंदन केले आहे. याशिवाय अनेक चाहत्यांनीही ‘काँग्रॅट्स’ आणि ‘वेटिंग फॉर द बिग डे’ अशा प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला आहे.
या पोस्टमुळे एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली आहे. फोटोमध्ये दिसणारी ही ‘मिस्ट्री गर्ल’ कोण आहे, याबाबत चाहत्यांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. काही जण ही त्याची होणारी पत्नी असल्याचे मानत आहेत, तर काहींना हा एखाद्या नवीन प्रोजेक्टचा भाग असावा, असा संशय आहे.
भूषण प्रधान यापूर्वीही आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. त्यामुळे या पोस्टमागील खरे कारण काय आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. तो खरोखरच लग्न करणार आहे की हा एखाद्या चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
या एका पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली असून, 24 जुलैची तारीख आता चाहत्यांसाठी खास ठरणार आहे. पुढील काही दिवसांत या रहस्यावर पडदा उघडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.