Cabinet Expansion : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, खासदार श्रीकांत शिंदेंची मंत्रीपदी वर्णी?, चार्टर विमानाने दिल्लीला रवाना

Cabinet Expansion : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, खासदार श्रीकांत शिंदेंची मंत्रीपदी वर्णी?, चार्टर विमानाने दिल्लीला रवाना

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार गेल्या काही दिवसांत होण्याची दाट शक्यता आहे. ऑपरेशन टायगर मोहिमेनंतर या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज, मंगळवारी पहिल्यांदाच दिल्लीत दाखल होत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार 17 जुलै रोजी होणार आहे. दरम्यान, शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला एक कॅबिनेट मंत्रिपद तर एक राज्यमंत्री पद येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. तर ठाकरे सेनेतून आलेल्या सहा खासदारांमध्ये मंत्रि‍पदासाठी रस्सीखेच सुरू असून कोणाच्या पदरात मंत्रीपद पडणार हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत शिंदे यांची ही महत्ताची बैठक पार पडणार आहे. आज संध्याकाळी 4 वाजता खासदार श्रीकांत शिंदे हे शिवसेनेच्या खासदारांना चार्टड विमानाने मुंबईहून दिल्लीला रवाना होणार आहेत.

हेही वाचा : Sunetra Pawar: सुनेत्रा पवार यांच्या निवडीवरून राष्ट्रवादीत नवा वाद; ‘नोटीसला उत्तर देणार नाही’, अनिल पाटील ठाम

दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळात विस्तारात शिवसेनेला एक कॅबिनेटमंत्री व राज्यमंत्रीपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यात खासदार श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्री पद दिले जाणार असल्याचे समजते. तर राज्यमंत्री पदासाठी नव्याने आलेल्या ठाकरे गटातील ६ खासदारांपैकी एकाला मिळण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर असून गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे. 

दरम्यान या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला स्थान मिळणार की नाही याविषयीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मंत्रिमंडळ विस्तारात सहभागाबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झाले नसल्याचे समोर येत आहे. एनडीएत सहभागी झाल्यापासून पक्षाने राज्यमंत्री पदाऐवजी कॅबिनेटची मागणी लावून धरलेली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version