Madhurani Gokhale : अभिनेत्री मधुराणीची मालिकेबाबतच्या वक्तव्यावर चाहत्यांच्या सकारात्मक कमेंट्स; म्हणाली, "आपल्या आजूबाजूला इन्फ्लुएंसर्स पण आदर्श नाही"

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित 'स्टार प्रवाह' वाहिनी 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही नवीन मालिका सर्वांच्या भेटीला घेऊन येत आहे.
Madhurani Gokhale : अभिनेत्री मधुराणीची मालिकेबाबतच्या वक्तव्यावर चाहत्यांच्या सकारात्मक कमेंट्स; म्हणाली, "आपल्या आजूबाजूला इन्फ्लुएंसर्स पण आदर्श नाही"

स्टार प्रवाह प्रेक्षकांसाठी एक नवी मालिका घेऊन येत आहे. ज्यांच्यामुळे आज लेकीबाळी बाहेर जाऊन पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन प्रत्येक क्षेत्रात आपली उत्तम कामगिरी बजावत आहे. अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित आणि त्यांच्या संघर्षावर आधारित 'स्टार प्रवाह' वाहिनी 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही नवीन मालिका सर्वांच्या भेटीला घेऊन येत आहेत. स्टार प्रवाह' वाहिनीने याआधी 'राजा शिवछत्रपती', 'जय भवानी, जय शिवाजी', 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या मालिकांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा सुवर्ण इतिहास आणि विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचवले आहेत.

या मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सावित्रीबाई फुलेंची भूमिका साकारणार असून डॉ. अमोल कोल्हे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या भूमिकेत दमदार पुनरागमन करणार आहेत. तसेच अमोल कोल्हेंच्या जगदंब क्रिएशन्स या निर्मिती संस्थेने या मालिकेची निर्मिती केली आहे. या मालिकेचे संगीत दिग्दर्शन आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे यांनी केलेअसून ते आदर्श शिंदे यांनी गायल आहे. तसेच या मालिकेला गीत आदर्श शिंदे, मंदार शिंदे, मंदार चौधरी, हर्षद शिंदे यांनी दिले आहे. दरम्यान, 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही नवीन मालिका नवीन वर्षात 5 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मधुराणी आणि डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह मालिकेत कोणकोणते कलाकार झळकणार याबाबत उत्सुकता लागली आहे. 

मधुराणी गोखले आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाल्या की, "आपण म्हणतो की, बदल झाला आहे. बऱ्याच अंशी बदल झाला आहे. पण तरीही स्त्रीच स्थान हे दुय्यमच आहे. आजही अनेक ठिकाणी तिच्यासाठी लग्न महत्त्वाच मानल जात, ना की तिच शिक्षण आणि करिअर… लग्न झालं म्हणून शिक्षण सोडाव लागत. मगं नवरा कमतोय मग तुला नोकरी करण्याची काय गरज आहे म्हणून घरी बसाव लागत. ज्या बाहेर पडतायत काही तरी करू पाहतायत, त्यांना वर्कप्लेसमध्ये वेगवेगळे चॅलेंजेस आहेत. अगदी अत्याचारापासून ते घरेलूहिंसेपर्यत…. मला असं वाटत प्रत्येक स्त्री वेगवेगळ्या पातळीवर आजही लढतेच आहे. आपलं स्थान निर्माण करण्यासाठी आपल्याला अजून बराच प्रवास करायचा आहे. प्रत्येक स्त्रीला लढण्यासाठी प्रेरणा असण गरजेच आहे आणि ती सावित्री आहे. कारण आपल्या आजूबाजूला तसे कोणी आदर्श नाही.. आपल्या आजूबाजूला इन्फ्लुएंसर्स आहेत पण आदर्श नाही. सावित्री ही धगधगदी मशआल आजच्या स्त्रीयांसाठी एक उत्तम प्रेरणा आहे. असं मला वाटत." 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version