Rakhi Sawant On Nitish Kumar: ‘मी तुमचं धोतर खेचलं तर…’; नितीश कुमार यांच्या ‘त्या’ कृतीवर राखी सावंत भडकली

नितीश कुमार यांनी एका जाहीर कार्यक्रमात बुरखाधारी मुलीचा बुरखा सर्वांसमोर खेचला यावर राखी सावंतने नितीश कुमार यांनी केलेल्या कृतीवर टीकेचा भडीमार करीत एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Rakhi Sawant On Nitish Kumar: ‘मी तुमचं धोतर खेचलं तर…’; नितीश कुमार यांच्या ‘त्या’ कृतीवर राखी सावंत भडकली

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नितीश कुमार यांनी एका जाहीर कार्यक्रमात बुरखाधारी मुलीचा बुरखा त्यांनी स्वत: कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्वांसमोर खेचला आणि त्यांच्या या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पाटणा येथे आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्राचे वाटप मुख्यमंत्र्‍यांच्या हस्ते करण्यात येत होते.

हेही वाचा- Ankita Walawalkar: देशसेवा, देशासाठी जगणाऱ्यांची किंमत कमी होतेय…’ धुरंधर चित्रपटानंतर सुरू झालेल्या ट्रेंडवरून अंकिताने रील्सस्टार्सना चांगलंच फटकारलं; Video व्हायरल

त्यावेळेस त्यांच्या समोर बुरखा परिधान केलेली ही महिला नियुक्तीपत्र घेण्यासाठी त्यांच्यासमोर आली असता, ‘हे काय आहे?’ असं म्हणत तिच्या चेहऱ्यावरील बुरखा खेचला. त्यामुळे अनेक राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातून नितीश कुमार यांच्या या कृतीवर टीका केली जात आहे. अशातच राखी सावंत हिनं देखील तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नितीश कुमार यांनी केलेल्या कृतीवर टीकेचा भडीमार करीत एक व्हिडिओ शेअर केला आहे.

हेही वाचा- Rohit Pawar On Sanjay Shirsat : कोकाटेंनंतर शिरसाटांची विकेट? रोहित पवारांचा ट्वीटमधून मोठा दावा

यावेळी तिने म्हटलं आहे की, “नमस्कार… नितीश कुमारजी. चरण स्पर्श. तुमचे आशीर्वाद माझ्यावर असूदेत. मी तुमचा आदर करते. तुम्ही एक चांगले नेते, चांगले पती, पिता आहेत. पण तुम्ही हे काय केलं? एका मुस्लिम तरुणीला तुम्ही पुरस्कार देत आहात, तिचा सन्मान करताय. पण तुम्हाला पाच पैशांच सुद्धा ज्ञान नाहीये का? मुस्लिम महिला नकाब परिधान करते तेव्हा तिच्या नकाबाला कुणीही स्पर्श देखील करू शकत नाही. तुम्ही तर देशातले इतके दिग्गज नेत्यांपैकी एक आहात. तुम्ही मुख्यमंत्री आहात. पण आता तुम्ही हे काय करून बसलात? तुम्ही एका मुस्लिम महिलेचा नकाब ओढलाय. हे किती चुकीचं आहे”.

“तुम्ही असे सगळे प्रकार करत आहात. जर मी तुमच्या जवळ आले अन् भर कार्यक्रमात तुमचं धोतर खेचलं , पायजम्याची नाडी खेचली तर तुम्हाला चालणार आहे का? एका महिलेला तुम्ही सन्मान दिता, अन् लगेच तिला असा असा अपमानही करता. तुम्ही तिची जाहीर माफी मागायला हवी. मीडियासमोर तिला बोलवा अन् तिची माफी मागा….असं राखीनं म्हटलंय.” दरम्यान या व्हिडिओच्या माध्यमातून राखी सावंत यांनी देखील नितीश कुमार यांच्याकडे माफीची मागणी केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version