Viral Video: ‘जर ऐश्वर्या रायचा घटस्फोट झाला तर मी तिच्याशी लग्न करेन ‘;हे काय बोलून गेले पाकिस्तानचे धर्मगुरू?

पाक धर्मगुरू मुफ्ती कावी यांनी ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन वेगळे होऊ शकतात असा दावा करत स्वतःला तिच्याशी लग्नासाठी तयार असल्याचं म्हटलं.
Viral Video: ‘जर ऐश्वर्या रायचा घटस्फोट झाला तर मी तिच्याशी लग्न करेन ‘;हे काय बोलून गेले पाकिस्तानचे धर्मगुरू?

Viral Video: बॉलिवूडच्या सर्वात चर्चित आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेली ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा अनपेक्षित कारणामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर फिरत असलेल्या एका व्हिडिओमुळे पाकिस्तानातील वादग्रस्त धर्मगुरू मुफ्ती अब्दुल कावी चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. या व्हिडिओमध्ये त्यांनी ऐश्वर्या रायबद्दल केलेली विधानं अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरत आहेत.

व्हायरल झालेल्या या क्लिपमध्ये मुफ्ती कावी असा दावा करताना दिसतात की, ऐश्वर्या राय आणि तिचे पती अभिषेक बच्चन यांच्या नात्यात सध्या तणाव असल्याच्या चर्चा आहेत. या तणावाचा दाखला देत ते पुढे म्हणतात की, “जर हे दोघे वेगळे झाले, तर पुढील काही महिन्यांत ऐश्वर्या मला लग्नाचा प्रस्ताव देऊ शकते.” त्यांच्या या वक्तव्यामुळे इंटरनेटवर उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या. काहींनी हे हास्यास्पद ठरवत विनोद केले, तर काहींनी त्यांची वक्तव्यं ‘स्वतःसाठी प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न’ असल्याचं म्हटलं.

याहूनही पुढे जात मुफ्ती कावी म्हणतात की, ऐश्वर्या त्यांच्याशी लग्न करू इच्छित असेल, तर तिने इस्लाम धर्म स्वीकारावा. ते म्हणतात, “लग्नाआधी तिचं नाव मी बदलून मुस्लिम नाव ठेवेन.” त्यांनी सुचवलेलं नाव ‘आयेशा राय’ असं सांगितलं. या वक्तव्यावर नेटकऱ्यांनी तुफान प्रतिक्रिया देत अनेक मीम्स आणि विनोदी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या.

पॉडकास्टदरम्यान होस्टने त्यांना विचारलं की, एखादी बिगर मुस्लिम व्यक्ती धर्मांतराशिवाय त्यांच्याशी लग्न कसं करू शकते? यावर त्यांनी राखी सावंतचा उल्लेख करत उत्तर दिलं. त्यांच्या या विधानामुळे चर्चा आणखी रंगली आणि नेटकऱ्यांनी त्यांना पुन्हा एकदा ट्रोल करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा:Hema Malini’s Emotional Tribute To Dharmendra: धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी पहिल्यांदाच झाल्या व्यक्त , म्हणाल्या, ‘ते माझ्यासाठी सर्वकाही…’

या संपूर्ण प्रकरणात ऐश्वर्या राय बच्चन किंवा बच्चन कुटुंबातील कोणीही प्रतिक्रीया दिलेली नाही. तथापि, ऐश्वर्यासारख्या जागतिक दर्जाच्या अभिनेत्रीबद्दल अशा प्रकारे खुल्या मंचावर चर्चा करणं योग्य आहे का, यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहेत. सोशल मीडियावर काहींनी याला ‘पब्लिसिटी स्टंट’ म्हटलं, तर काहींनी त्याचं मानसिक संतुलन बिघडल्याचा आरोप केला.

दरम्यान, इंटरनेटवर सुरू असलेल्या गमतीदार कमेंट्समुळे हा विषय अजूनच व्हायरल होत आहे. “ऐश्वर्या राय ऐकली तर अभिषेकच तिचा फोन हिसकावून घेईल,” किंवा “हे बोलताना त्यांना स्वतःवर खरंच विश्वास होता का?” अशा मजेशीर प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत.

या सर्व गदारोळात एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे. सेलिब्रिटींबद्दल कोणतीही अफवा किंवा विचित्र दावा इंटरनेटवर किती झपाट्याने वायरल होऊ शकतो. ऐश्वर्या राय बच्चनवर आलेल्या या नव्या वादाने नेटकऱ्यांना भरपूर ‘कंटेंट’ दिलं असलं, तरी या विधानांना किती महत्त्व द्यायचं हे ठरवणं प्रेक्षकांच्या हाती आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version