Gold New Rates : काय सांगता? सोनं स्वस्त झालं! गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात किती रुपयांची घसरण; जाणून घ्या

गेल्या काही महिन्यांपासून विक्रमी दरामुळे सामान्य ग्राहक दागिने खरेदीपासून दूर गेले होते. मात्र आता सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासा देणारी माहिती समोर आली आहे.
Gold New Rates : काय सांगता? सोनं स्वस्त झालं! गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात किती रुपयांची घसरण; जाणून घ्या

गेल्या काही महिन्यांपासून विक्रमी दरामुळे सामान्य ग्राहक दागिने खरेदीपासून दूर गेले होते. मात्र आता सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. येत्या काळात सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात होती. ही शक्यता खरी ठरली आहे. सोन्याच्या दरात अचानक घट झाली असून सोन्याची किंमत सामान्य ग्राहकांच्या खिशाला परवडणारी झाली आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात एमसीएक्सवर 24 कॅरेट सोनं प्रति तोळा 2.64 टक्क्यांनी घसरला असून चांदीच्या दरात 6940 रूपयांनी घट झाली आहे. देशांतर्गत मार्केटमध्येही सोन्याच्या दरात घसरण पाहायाला मिळाली. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दराने 1,32,294 पर्यंतचा टप्पा गाठला होता. मात्र आठवड्याच्या शेवटीपर्यंत हाच दर 8,894 रूपयांनी घसरला. तर दुसरीकडे आठवडाभरात चांदीचे दर 14,885 रुपये प्रति किलो स्वस्त झाले.

तसेच देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर पाहायला गेलो तर, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या दरात प्रति तोळा 1760 रुपयांनी घसरले असून 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 114,311 रुपयांवर पोहोचला. तर चांदीच्या भावातही 1,62,730 रुपयांवरून 1,59,337 रुपयांवर आला. सुरुवातीला सोन्याच्या दराने मोठी झेप घेतली होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत सोन्या चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. काही ठिकणी तर सोन्याच्या किंमतींनी लाखोंचा टप्पा पार केला. अशा परिस्थितीत ग्राहकांसाठी सोनं चांदी खरेदी कराव की नाही असा प्रश्न उपस्थित होत होता. केवळ सोन्याच्याच नाही तर चांदीच्या किंमतीत देखील सतत वाढ होत असल्याच पाहायला मिळाल. मात्र आता सोने-चांदीच्या घसरणीमुळे ग्राहकांना दिसाला मिळणार आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version